अस्वस्थ नाट्यकर्मीचे प्रगल्भ चिंतन
अतुल पेठे हे नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता, संयोजक अशा विविध अंगाने तीस वर्षांहून अधिक काळ नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. एक गंभीर, प्रयोगशील रंगकर्मी असा त्यांचा सार्थ लौकीक आहे. ‘नाटकवाल्याचे प्रयोग’ हे त्यांचे पुस्तक म्हणजे त्यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख, भाषणे आणि त्यांच्या मुलाखती यांचे संकलन आहे. एका विचारी रंगकर्मीच्या धारणा, चिंतन, त्याच्या प्रवासात या सगळ्यात होत गेलेले बदल, …